Uddhav Thackeray । भाजपकडून (BJP) रमजान ईदानिमित्त 35 ते 36 लाख मुस्लिम कुटुंबियांना सौगात ए मोदी (Saugat E Modi) योजनेअंतर्गत भेटवस्तू वाटप करणार आहे. यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला आहे.
“विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा देणारे आता ईदनिमित्त मुस्लिम कुटुंबीयांच्या घरी जाऊन भेटवस्तू देणार आहेत. हेच भाजपचे राजकारण आहे. सत्ता मिळवण्यासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात,” असा घणाघात ठाकरेंनी केला.
“भाजपने इतकी वर्ष हिंदू मुस्लिम भांडणं लावली. यात काही लोकांचा जीव गेला. त्यांनी आता जाहीर करावे की त्यांनी हिंदुत्व सोडले आहे. आता हनुमान जयंती आणि राम नवमी येणार आहे. जसा अल्पसंख्याक सेल आहे. तसा भाजपचा अल्पसंख्याक सेल आहे का?,” असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
“भाजपच्या पैशातून ही भेट जात असून हिंदुंना घंटा वाजवायला लावली जाते. त्यांना दंगलीसाठी वापरायचे आणि ज्यांच्याकडून दंगल करायला लावायची त्यांचे जीव जातात. घरे जाळली जातात. त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि हे सत्तेसाठी सर्वांच्या गळाभेटी घेतात,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis and Eknath Shinde
तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरही निशाणा साधला. “मुख्यमंत्री पदासाठी अनेक कोंब फुटले होते, पण तेच आता त्यांना छळत आहेत,” असा टोला शिंदेंनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या :