Share

ट्रम्प लिजेंड, पण मोदी लिजेंडचे बाप म्हणणारी कंगना काही तासांत गप्प का झाली? कारण ऐकून धक्काच बसेल!

Kangana Ranaut slammed Donald Trump over his comment advising Apple not to expand in India. She called Modi “legend’s father”, but later deleted the tweet after BJP leadership’s advice.

Published On: 

Kangana Ranaut slammed Donald Trump over his comment advising Apple not to expand in India. She called Modi “legend’s father”, but later deleted the tweet after BJP leadership's advice.

दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात आयफोन उत्पादक कंपन्या सुरू करू नयेत असा सल्ला दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने ट्विटरवरून थेट हल्ला चढवत मोदींचे समर्थन केले होते.

कतारमध्ये उद्योजकांच्या परिषदेत ट्रम्प यांनी कुक यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत सांगितले की, “माझं टिम कुकसोबत बोलणं झालं. ते भारतात कारखाने उभारत आहेत. मी त्यांना स्पष्ट सांगितलं – मला भारतात काहीही नकोय.” यानंतर भारतीय सोशल मीडियावर ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठली.

Kangana Ranaut slams Donald Trump

यावर प्रतिक्रिया देत कंगना रणौतने ट्विट केले, “ट्रम्प लिजेंड असतील, पण नरेंद्र मोदी लिजेंडचे बाप आहेत. ट्रम्प यांची दुसरी टर्म आहे, तर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. तुम्ही अमेरिकेचे अध्यक्ष असाल, पण मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.” कंगनाचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

मात्र, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सूचनेनंतर कंगनाने ट्विट डिलीट केले असून ती म्हणाली, “मी माझं मत मांडलं होतं, पण पक्षाच्या वरिष्ठांच्या सल्ल्यामुळे मी ते ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून हटवले आहे. याबद्दल मला खेद आहे.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install