Share

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, विदर्भातील बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Uddhav Thackeray’s Shiv Sena senior leader Bandu Tagade from Nagpur joins Eknath Shinde group. Shinde Sena continues to grow in Vidarbha region.

Published On: 

Sanjay Shirsat has offered Uddhav Thackeray group leader Chandrakant Khaire , Bandu Tagade to join his group | ShivSena UBT

नागपूर – राज्यात विधानसभेपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला असून, ठाकरे गटासाठी विदर्भात संकटाचे सावट गडद होत आहे. नागपूर ग्रामीणचे माजी जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे जुने निष्ठावान नेते बंडू तागडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात तागडे यांनी अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “जुने शिवसैनिक हेच पक्षाची खरी ताकद असून, त्यांना सन्मानाचे स्थान देणे हीच खरी शिवसेना आहे.”

Bandu Tagade Joins Eknath Shinde’s Shiv Sena

हा घडामोड केवळ नागपूरपुरती मर्यादित राहिलेली नाही. पूर्व विदर्भात शिंदे गटाचा प्रभाव वाढत असून, अलीकडेच किरण पांडव यांच्या पुढाकाराने अनेक कार्यकर्ते पक्षात दाखल झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याची जबाबदारी मंगेश काशीकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर भंडाऱ्यात समन्वयकपदाची जबाबदारी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

बंडू तागडे कोण?

बंडू तागडे गेली 40 वर्षे नागपूर शहरातील शिवसेनेत सक्रिय आहेत. विनायक राऊत आणि माजी खासदार प्रकाश जाधव यांचे विदर्भातील निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.  बंडू तागडे यांचा कामगार चळवळीतही सक्रीय सहभाग राहिलेला आहे. बंडू तागडे यांच्यामुळे एक मोठा कार्यकर्तावर्ग शिंदे गटासोबत जोडला गेला आहे. याआधी माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी आणि नेते राजू हरणे यांनी ठाकरे गटाचा निरोप घेत शिंदे गटाची साथ धरली होती.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install