Covid – 19 | गुड न्यूज! सोमवारी मुंबईत शून्य कोरोनाबाधितांची नोंद

Covid – 19 | मुंबई: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. जवळपास चार महिन्यानंतर मुंबई शहरात शून्य कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा हा आकडा समोर आला आहे. कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

No corona patient was found in Mumbai on Monday

मुंबईमध्ये सोमवारी (19 जून) एकही कोरोना (Covid – 19) बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. मुंबईकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. त्याचबरोबर मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याचं दिसून आलं आहे. मुंबईमध्ये सध्या फक्त 26 सक्रिय कोरोना रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंबई शहरामध्ये आतापर्यंत 1163913 कोरोना (Covid – 19) रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी 19773 रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 114104 रुग्णांनी या भयंकर महामारीवर मात केली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासात मुंबईमध्ये एकही नव्या कोरोना (Covid – 19) रुग्णाची नोंद झालेली नाही. त्यामुळे मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट 98.3 % इतका झाला आहे. या माहितीनंतर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली, तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे अनिवार्य आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियमित मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.