Crime News | आजार बरा करण्याचं कारण अन् भोंदूबाबाकडून महिलेचा शारीरिक छळ

Crime News | नाशिक: नाशिक शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथे ही घटना घडली आहे. या ठिकाणी एका भोंदूबाबांनं महिलेचा शारीरिक छळ केला असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. The victim had been ill for several years पीडित महिला गेल्या अनेक वर्षापासून आजारी होती. अनेक … Read more

Published On: 

Crime News | नाशिक: नाशिक शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथे ही घटना घडली आहे. या ठिकाणी एका भोंदूबाबांनं महिलेचा शारीरिक छळ केला असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

The victim had been ill for several years

पीडित महिला गेल्या अनेक वर्षापासून आजारी होती. अनेक रुग्णालयीन उपचार करूनही तिचा हा आजार बरा होत नव्हता. त्यामुळे उपचारासाठी ती भोंदूबाबाकडे (Crime News) गेली. भोंदूबाबा किशोर संजय लोखंडे यांनी जादूटोणा करून आजार बरं करण्याचं आश्वासन तिला दिलं. उपचार करण्याच्या निमित्ताने तो नेहमी तिच्या घरी जात होता.

नवऱ्याला जादूटोणा करून मारून टाकण्याची धमकी देत, त्यानं त्या महिलेसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार लासलगाव पोलिसांनी आरोपीवर गुन्हा (Crime News) दाखल केला.

दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस अंधश्रद्धेला (Crime News) बळी पडण्याच्या घटना वाढत चालल्या आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहे. तरीही राज्यात या प्रकारच्या घटना घडत आहे. या घटना कमी करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सातत्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही