Sanjay Raut | 20 जून जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: आज (19 जुन) शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्हींकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिवसेना वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. Today 19th June is Loyalist’s Day – Sanjay … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: आज (19 जुन) शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्हींकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिवसेना वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

Today 19th June is Loyalist’s Day – Sanjay Raut

माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “आज 19 जून हा निष्ठावंतांचा दिवस आहे. तर उद्या 20 जून म्हणजे जागतिक गद्दार दिन आहे. जगभरात 20 जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असं मी युनोला पत्र लिहिणार आहे. 20 जून हा जगातील सर्व गद्दारांचा दिवस असेल.

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “आमचं सरकार आल्यावर दरवर्षी 20 जूनला आम्ही गद्दार दिवस साजरा करू. त्याचबरोबर या दिवशी आम्ही चाळीस गद्दरांचं रावणाप्रमाणे दहन करू. जेव्हा-जेव्हा शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा-तेव्हा आम्ही नव्या जोमाने उभे राहिलो आहोत.”

“मुंबई आणि ठाण्याच्या पुढे शिवसेना जाणार नाही, असं म्हटलं जायचं. मात्र, शिवसेना आता दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. राष्ट्राच्या अनेक कामात शिवसेनेनं मोठे योगदान दिलं आहे. हे सर्व फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे झालं आहे”, असंही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही