Manisha Kayande | माझ्यासारख्या सीनियर नेत्यावर ज्युनिअर नेते हुकूम गाजवायचे; मनीषा कायंदेंचा खुलासा

Manisha Kayande | मुंबई: उद्धव ठाकरे गटातील मनीषा कायंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाला रामराम ठोकला. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे गटामध्ये माझ्यासारख्या सीनियर नेत्यावर ज्युनिअर नेते हुकूम गाजवत होते, असं त्या म्हणाल्या आहे.

I was ignored in the party – Manisha Kayande

मनीषा कायंदे (Manisha Kayande) म्हणाल्या, “पक्षांतर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मला कोणत्याही प्रकारचा आमिष दाखवलेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी मला छत्रपती संभाजीनगरचं महिला प्रमुख पद दिलं होतं. त्याचबरोबर त्यांनी मला विधान परिषदेत जाण्याची संधी दिली होती. मात्र, माझ्यावर जबाबदारी दिल्यानंतर मला माझी कामं करता येत नव्हती. पक्षातील ज्युनिअर नेते येऊन माझ्यासारख्या सीनियर व्यक्तीवर हुकुम गाजवत होते. ते मला आवडलं नाही. त्याबद्दल बोलूनही माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “मला तुमच्या पक्षात एक पद द्या, जेणेकरून मला मनमोकळेपणाने काम करता येईल, असं मी एकनाथ शिंदेंना पक्षांतर करताना सांगितलं आहे. कारण उद्धव ठाकरेंसोबत असताना मला मनमोकळेपणाने कामं करता येत नव्हतं

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनीषा कायंदे यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “ही अशी लोक असतात ना, ती कचऱ्याप्रमाणे असतात. हा कचरा इकडे-तिकडे उडत असतो. हवेचा झोका बदलला की हा कचरा पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो. त्यामुळे त्या कचऱ्याकडे दुर्लक्ष करा. ती फार महान लोकं नाही.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.