IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) च्या अंतिम सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने भारताला या सामन्यात 209 धावांनी हरवले. या सामन्यानंतर चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे.
Cheteshwar Pujara is going to England to play for County
भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर (IND vs WI) भारतीय संघाची साथ सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर पुजारा पुन्हा एकदा काऊंटी खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. याआधी देखील चेतेश्वर पुजारा काऊंटीमध्ये खेळला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी चेतेश्वर पुजाराने काऊंटीच्या या हंगामात सक्सेससाठी 6 सामने खेळले आहे. यामध्ये त्याने 8 डावात 3 शतक आणि एक अर्धशतक ठोकले आहे. या सहा सामन्यांमध्ये तो सक्सेसचा कर्णधार देखील होता.
दरम्यान, वेस्टइंडीज विरूद्ध (IND vs WI) भारतीय संघ पहिला कसोटी सामना 22 जुलै ते 16 जुलै दरम्यान तर दुसरा कसोटी सामना 20 जुलै ते 24 जुलै दरम्यान खेळणार आहे. एक दिवसीय मालिकेतील 03 सामने अनुक्रमे 27 जुलै, 29 जुलै आणि 15 ऑगस्ट रोजी खेळले जाणार आहे. तर टी-20 मालिकेतील 05 सामने अनुक्रमे 4 ऑगस्ट, 6 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट रोजी होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Shivsena | मातोश्रीच्या बाहेर शिंदे आणि ठाकरे गटाची जोरदार बॅनरबाजी
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर रिक्षा चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, नक्की काय आहे कारण?
- Eknath Shinde | ‘आदिपुरुष’मध्ये CM शिंदेंची एन्ट्री? नक्की काय आहे प्रकरण
- Hindu Dharma Sena | हिंदू धर्म सेनेची खास ऑफर! मुस्लिम मुलीशी लग्न करा अन् 11 हजार रुपये बक्षीस मिळवा
- Ajit Pawar | नेते म्हणतात फेविकॉलचा जोड, मात्र कार्यकर्ते संभ्रमण – अजित पवार