Share

Hindu Dharma Sena | हिंदू धर्म सेनेची खास ऑफर! मुस्लिम मुलीशी लग्न करा अन् 11 हजार रुपये बक्षीस मिळवा

Hindu Dharma Sena | मध्य प्रदेश: मध्यप्रदेशचा जबलपूर शहरातून महत्वाची बातमी समोर आली आहे. हिंदू मुलांनं मुस्लिम मुलीसोबत लग्न केलं तर त्याला 11 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा हिंदू धर्म सेना नावाच्या संघटनेनं केली आहे. या घोषणेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. Hindu girls are lured into love jihad and converted – Yogesh Agrawal … Read more

Published On: 

Hindu Dharma Sena | मध्य प्रदेश: मध्यप्रदेशचा जबलपूर शहरातून महत्वाची बातमी समोर आली आहे. हिंदू मुलांनं मुस्लिम मुलीसोबत लग्न केलं तर त्याला 11 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा हिंदू धर्म सेना नावाच्या संघटनेनं केली आहे. या घोषणेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.

Hindu girls are lured into love jihad and converted – Yogesh Agrawal

मुस्लिम तरुणी आणि हिंदू तरुणांच्या प्रेमविवाहाला पाठिंबा देण्यासाठी ही घोषणा केल्याचं हिंदू धर्म सेना संघटनेनं (Hindu Dharma Sena) सांगितलं आहे. संघटनेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी ही घोषणा केली आहे. ही घोषणा करताना योगेश अग्रवाल म्हणाले, “आमच्या मुलींना लव्ह जिहाद (Love Jihad) मध्ये अडकवून त्यांचे धर्मांतर केले जाते. हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “आमच्या हिंदू समाजात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही हा मोठा निर्णय (Hindu Dharma Sena) घेतला आहे. मुस्लिम मुलींना आम्ही आमच्याकडे घेऊन येणार आहोत. त्याचबरोबर या माध्यमातून आम्हाला हिंदू मुलींचे रक्षण करायचे आहे.”

दरम्यान, हिंदू धर्म सेना संघटनेच्या (Hindu Dharma Sena) या घोषणेनंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. या प्रकरणावर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्या जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install