Viral News | उत्तर प्रदेश: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पुनर्जन्माच्या गोष्टींवर कुणी विश्वास ठेवत नाही. अशात सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील एक पुनर्जन्माची एक घटना व्हायरल होत आहे. मुलीच्या पोटी वडिलांचा जन्म झाल्याची ही घटना उत्तर प्रदेशच्या मैनपुरीत घडली आहे. सोशल मीडियावर ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
I was Manoj Mishra in my previous life – Aryan Dubey
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीत आर्यन दुबे (Aryan Dubey) नावाचा आठ वर्षाचा मुलगा आहे. माझा पुनर्जन्म (Viral News) झाला असं आर्यननं त्याच्या घरच्यांना सांगितलं आहे. आर्यन त्याच्या आईला स्वतःची मुलगी म्हणू लागला आहे. मागच्या जन्मात मी मनोज मिश्रा (आर्यनचे आजोबा) होतो, असं आर्यननं म्हटलं आहे.
आर्यननं त्याच्या आजोबांबद्दल म्हणजेच मनोज मिश्रा यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे. विशेष म्हणजे मनोज मिश्रा (Manoj Mishra) यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या बँक खात्यात किती रक्कम होती, हे आर्याननं सांगितलं आहे. त्यामुळे आर्यन हा मनोज मिश्रा यांचा पुनर्जन्म (Viral News) आहे, असं बोललं जात आहे.
दरम्यान, आर्यननं मनोज मिश्रा यांचा मृत्यू कसा झाला याबाबत देखील माहिती दिली आहे. साप चावल्यामुळे मनोज मिश्रा यांचा मृत्यू झाला असल्याचं आर्यननं सांगितलं आहे. मनोज यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची मुलगी म्हणजेच आर्यनची आई गरोदर होती. त्यानंतर मनोज यांनी रंजनाच्या पोटी पुनर्जन्म (Viral News) घेतल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “शिंदेंची शिवसेना ही जत्रेतील शिवसेना आहे, जी तंबू…”; संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
- Amol Mitkari | शाईफेक प्रकरणावर चित्राताई बोलतील की नेहमीप्रमाणे सोयीचं राजकारण करतील? अमोल मिटकरी
- USB Charger | तुमच्या पण मोबाईलची चार्जिंग केबल लवकर खराब होत असेल, तर करा फॉलो ‘या’ टिप्स
- Eknath Shinde | मोठा गौप्यस्फोट! बंडाच्या एक महिनाआधी शिंदेंचं मुख्यमंत्री पद होतं फिक्स
- Crime | धक्कादायक! पैशासाठी डॉक्टरांनी विकलं नवजात लेकरू