Share

Sanjay Raut | “शिंदेंची शिवसेना ही जत्रेतील शिवसेना आहे, जी तंबू…”; संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

Sanjay Raut | मुंबई: 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्हीकडून वर्धापन दिनाची तयारी सुरू आहे. वर्धापन दिनानिमित्त शिंदे गटाकडून एक टिझर लाँच करण्यात आला आहे. या टिझरवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी ट्विट करत हा टिझर लॉन्च केला आहे. या टिझर व्हिडिओमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. या टिझरवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

Uddhav Thackeray is the party chief of Shivsena – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाला ते संबोधित करणार आहे. गावाच्या जत्रेमध्ये तंबू ठोकले जातात. या तंबूमध्ये खोटा चंद्र आणि खोट्या गाड्या असतात. लोक त्यावर बसून फोटो काढतात. त्याचप्रमाणे शिंदे गट म्हणजे खोटी शिवसेना आहे. शिंदे यांची शिवसेना ही जत्रेतील शिवसेना आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “खरी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे आमचा वर्धापन दिन आम्ही वाजत-गाजत साजरा करणार आहोत. बाकी जत्रा संपली की जत्रेतील तंबू काढून टाकले जातात. आता जत्रा संपायची वेळ जवळ आली आहे.”

महत्वाच्या बातम्या

Sanjay Raut | मुंबई: 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्हीकडून …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics