Amol Mitkari | शाईफेक प्रकरणावर चित्राताई बोलतील की नेहमीप्रमाणे सोयीचं राजकारण करतील? अमोल मिटकरी

Amol Mitkari | टीम महाराष्ट्र देशा: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या सोशल मीडिया प्रमुख अयोध्या पौळ (Ayodhya Paul) यांच्यावर ठाण्यामध्ये शाईफेक करण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांना मारहाण करण्यात आली असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्य सरकार आणि चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्ताधारी राजकारणासाठी किती खालची पातळी गाठू शकतात, असं म्हणतं अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर त्यांनी चित्रा वाघ यांना देखील सुनावलं आहे.

Amol Mitkari’s tweet on Chitra Wagh

श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सोशल मीडिया प्रमुख अयोध्याताई पौळ पाटील यांच्यावर काल कळवा परिसरात झालेली शाईफेक, सत्ताधारी राजकारणासाठी किती खालची पातळी गाठू शकतात हे दर्शविते.चित्राताई यावर काही बोलण्याचं धाडस दाखवतील का ? की नेहमीप्रमाणे सोयीचं राजकारण करतील?

दरम्यान, या प्रकरणानंतर अयोध्या पौळ यांनी संताप व्यक्त केला आहे. “उद्धव ठाकरे गटाचा कार्यक्रम आहे, म्हणून मला कळवा येथे बोलवण्यात आलं. त्यानंतर मला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करायला सांगितलं. त्यावेळी एका महिलेनं येऊन मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप माझ्यावर केला. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात त्यांनी माझ्या अंगावर शाईफेक केली, असं त्या म्हणाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.