Devendra Fadnavis | पुन्हा बॅनरबाजी! पुण्यात राष्ट्रवादीने लावले फडणवीसांच्या विरोधात बॅनर

Devendra Fadnavis | पुणे: सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार बॅनरबाजी बघायला मिळत आहे. या बॅनर प्रकरणावरून विरोधी आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादीने काही प्रश्न उपस्थित केले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असं देखील या बॅनरमध्ये … Read more

Published On: 

Devendra Fadnavis | पुणे: सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार बॅनरबाजी बघायला मिळत आहे. या बॅनर प्रकरणावरून विरोधी आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादीने काही प्रश्न उपस्थित केले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असं देखील या बॅनरमध्ये म्हटलं आहे.

पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले आहे. गृहमंत्री साहेब राजीनामा द्या, असं बॅनरच्या माध्यमातून म्हटलं आहे. त्याचबरोबर याच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

NCP banner against Devendra Fadnavis

  • गृहमंत्री साहेब राजीनामा द्या
  • महाराष्ट्र सुरक्षित आहे का?
  • इथे महिला सुरक्षित नाही… चालू लोकलमध्ये बलात्कार
  • इथे नेते सुरक्षित नाही… विरोधी पक्षातील नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे
  • इथं पत्रकार सुरक्षित नाही… पत्रकारांना गाडीखाली चिरडलं जात आहे
  • इथे रोज जाती आणि धर्म तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जातात. दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय… तरीही कुठलीही ठोस कारवाई नाही
  • भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून रोज जनसामान्यांची फसवणूक होत आहे.
  • वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये? असं या बॅनरमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदीप भगवान हुमे यांनी पुणे शहरात हे बॅनर (Devendra Fadnvis) लावले आहे. त्यांच्या या बॅनरबाजीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर या बॅनरनंतर राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही