Eknath Shinde | मोठा गौप्यस्फोट! बंडाच्या एक महिनाआधी शिंदेंचं मुख्यमंत्री पद होतं फिक्स

Eknath Shinde | मुंबई: एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली होती. शिंदेंनी भाजपसोबत (BJP) युती करत सरकार स्थापन केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री पद विराजमान झाले. याच पार्श्वभूमीवर एक मोठा खुलासा झाला आहे. Nitin Deshmukh has revealed a big secret ठाकरे गटाचे सचिव आणि … Read more

Published On: 

Eknath Shinde | मुंबई: एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केली होती. शिंदेंनी भाजपसोबत (BJP) युती करत सरकार स्थापन केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री पद विराजमान झाले. याच पार्श्वभूमीवर एक मोठा खुलासा झाला आहे.

Nitin Deshmukh has revealed a big secret

ठाकरे गटाचे सचिव आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी आमदार नितीन देशमुख आणि आमदार कैलास घोडके पाटील यांची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नितीन देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार हे बंड करण्याच्या आधीच ठरलं होतं, असं ते यावेळी म्हणाले आहे.

आवाज कुणाचा या पॉडकास्टमध्ये बोलताना नितीन देशमुख म्हणाले, “मी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री केलं असं देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर म्हणतात. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार हे आधीच ठरलेलं होतं. देवेंद्र फडणवीस यांना सत्तांतर होणार एवढंच माहीत होतं. ”

“अमित शाह (Amit Shah) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री कोण होणार? हे माहीत होत. सत्तांतर होण्याच्या एक महिनाआधी एकनाथ शिंदेंसह आम्हाला याबाबत माहिती होतं. मी मुख्यमंत्री होणार आहे, हे स्वतः एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं होतं, असही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही