Share

Ambadas Danve | अयोध्या पौळ यांना मारहाण हे नामर्दानगीचं लक्षण आहे – अंबादास दानवे

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या सोशल मीडिया प्रमुख अयोध्या पौळ (Ayodhya Paul) यांच्यावर काल शाईफेक करून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Abusers do not have the courage to do anything face to face – Ambadas Danve

अयोध्या पौळ शाईफेक प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “अयोध्या पौळ यांना मारहाण करणं नामर्दानगीचं लक्षण आहे. एका महिलेला चुकीच्या पद्धतीने निमंत्रण देऊन आणि चक्रव्यू रचून हा सर्व प्रकार करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये समोरासमोर काही करण्याची हिंमत नाही. म्हणून त्यांनी हा कट रचला आहे.”

पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “समोरासमोर ते तिच्यासोबत लढू शकत नव्हते. समोरासमोर लढायचा दम या गद्दारांमध्ये नाही. एकटीला घेरून मारणं हे नामर्दानगीच लक्ष नाही. अयोध्या पौळ एक वाघीण आहे आणि ती स्वतःसाठी लढणार आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर अयोध्या पौळ यांनी संताप व्यक्त केला आहे. “उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम आहे म्हणून मला कळवा येथे बोलवण्यात आलं. त्यानंतर मला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करायला सांगितले. त्यावेळी एका महिलेने येऊन मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप माझ्यावर केला. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात त्यांनी माझ्या अंगावर शाईफेक केली, असं त्या म्हणाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या सोशल मीडिया प्रमुख अयोध्या पौळ (Ayodhya Paul) यांच्यावर काल शाईफेक …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now