Sanjay Raut | सरकार देशाचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करत आहे; जवाहरलाल नेहरू संग्रहालयाच्या नामांतरावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई: नवी दिल्लीतील ‘नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी’चं नाव बदलण्यात आलं आहे. या म्युझियमचं नाव बदलून ‘पीएम म्युझियम अँड लायब्ररी’ ठेवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येत आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मोदी सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यामुळे या म्युझियमला त्यांचं नाव देण्यात आलं होतं. मात्र, सरकार आता इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ज्यांनी आपल्या देशासाठी मोलाचे योगदान दिलं आहे, त्यांना संपवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे.”

There was no need to change the name of the museum – Sanjay Raut

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “अटलजी, इंदिराजी, लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या पंतप्रधानांनी देशासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. दिल्लीतील या संग्रहालयाचं नाव बदलण्याची काहीच गरज नव्हती. मात्र, पंडित नेहरू यांच्याबद्दल असलेल्या द्वेषामुळे हे काम करण्यात आलं आहे.”

दरम्यान, या संग्रहालयामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू पासून ते नरेंद्र मोदी (Narendra Modi) पर्यंत सर्व पंतप्रधानांविषयी माहिती उपलब्ध आहे. या ठिकाणी त्यांची माहिती, कागदपत्र, फोटो इत्यादी गोष्टी ठेवण्यात आले आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने शुक्रवारी या संग्रहालयाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या