Ajit Pawar | नेते म्हणतात फेविकॉलचा जोड, मात्र कार्यकर्ते संभ्रमणात – अजित पवार

Ajit Pawar | छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवर भाष्य केलं होतं. ये फेविकॉल का जोड है तुटेगा नही, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर शाब्दिक हल्लाबोल करत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “सत्तेतील मोठे नेते म्हणतात फेविकॉलचा मजबूत जोड आहे. परंतु पक्षातील कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांनं त्यांना समजून सांगितलं पाहिजे.”

Shinde-Fadnavis government should manage the governance properly – Ajit Pawar

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “उणीधुणी काढण्यापेक्षा सरकारनं राज्यातील राज्यकारभार नीट सांभाळायला हवा. देशातील महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे तरुण आत्मदहनाचा प्रयत्न करतात. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीनं लक्ष द्यायला हवं.”

“राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहिलेली नाही. राज्यात जातीय दंगलींचे प्रमाण वाढत चालले आहे. शिंदे-फडणवीस सरकारनं त्याकडे लक्ष द्यायला हवं”, असही ते (Ajit Pawar) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या