Shivsena | मुंबई: आज शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्हीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापन दिन साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार बॅनर्जी झाल्याचं दिसून आलं आहे.
Banner war between Shinde and Thackeray group
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त (Shivsena) ठाण्यात आणि मुंबईत जागोजागी बॅनर्स लावण्यात आले आहे. त्याचबरोबर मातोश्री परिसरात देखील बॅनर दिसले आहे. मातोश्रीजवळ शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांची जोरदार बॅनरबाजी दिसून आली आहे. या बॅनरबाजीवरून दोन्ही गटाकडून काय प्रतिक्रिया येथील याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा दोन मिळावे होणार आहेत. आतापर्यंत वर्धापन दिनानिमित्त (Shivsena) शिवसेनेचा एकच मेळावा व्हायचा. मात्र, आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनीही दोन वेगवेगळ्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आज शिवसेनेच्या (Shivsena) वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट दोघांनीही मेळाव्याचे आयोजन केले आहे. शिंदे गटाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा संध्याकाळी 07 वाजता किंग सर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर रिक्षा चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, नक्की काय आहे कारण?
- Eknath Shinde | ‘आदिपुरुष’मध्ये CM शिंदेंची एन्ट्री? नक्की काय आहे प्रकरण
- Hindu Dharma Sena | हिंदू धर्म सेनेची खास ऑफर! मुस्लिम मुलीशी लग्न करा अन् 11 हजार रुपये बक्षीस मिळवा
- Ajit Pawar | नेते म्हणतात फेविकॉलचा जोड, मात्र कार्यकर्ते संभ्रमण – अजित पवार
- Sanjay Raut | सरकार देशाचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करत आहे; जवाहरलाल नेहरू संग्रहालयाच्या नामांतरावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया