Eknath Shinde | ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर एका रिक्षा चालकाने रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. विनय पांडे नावाच्या रिक्षा चालकांनं हे कृत्य केलं आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू झाला आहे.
Rickshaw driver attempted self-immolation after the RTO revoked the rickshaw’s license
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंगल्याबाहेर रिक्षा चालकानं आत्मदानाचा प्रयत्न केला. आरटीओने रिक्षाचा परवाना रद्द केल्यामुळे हाताश होऊन त्यानं हे कृत्य केलं, असल्याची माहिती मिळाली आहे. हा रिक्षा चालक कोपरी पाचपाखडी परिसरातील शिवसेना पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी (17 जून) साधारण दुपारी साडेबाराच्या सुमारास विनय पांडे हा रिक्षा चालक मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंगल्याबाहेर आला. त्यानंतर त्यानं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस उपस्थित असल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या या रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | ‘आदिपुरुष’मध्ये CM शिंदेंची एन्ट्री? नक्की काय आहे प्रकरण
- Hindu Dharma Sena | हिंदू धर्म सेनेची खास ऑफर! मुस्लिम मुलीशी लग्न करा अन् 11 हजार रुपये बक्षीस मिळवा
- Ajit Pawar | नेते म्हणतात फेविकॉलचा जोड, मात्र कार्यकर्ते संभ्रमण – अजित पवार
- Sanjay Raut | सरकार देशाचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न करत आहे; जवाहरलाल नेहरू संग्रहालयाच्या नामांतरावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- WhatsApp | व्हाट्सॲप वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच लॉन्च होणार ‘हे’ जबरदस्त फिचर