Sanjay Raut | मुंबई: शिवसेना आज 57 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्हीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर या दिनानिमित्त दोन्ही गटाकडून मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे.
The Shinde group does not know the date of foundation day of Shivsena – Sanjay Raut
शिंदे गटावर टीका करत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “काल मुंबईमध्ये मी त्या गद्दार गटाचे होल्डिंग बघितले. त्याच्यावर त्यांनी शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन असं लिहिलं आहे. त्यांना शिवसेनेच्या स्थापना दिनाची तारीख माहिती नाही. ते शिवसेनेवर दावा सांगू लागले आहेत. निवडणूक आयोगाकडून हे खोटा कागद घेऊन येत आहे.”
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “खोटे सातबारे, खोटे कागदपत्र तयार करायचे आणि नाचवायचे. अब्दुल सत्तार यांच्या काळामध्ये बोगस सातबाऱ्याचे प्रकरण वाढत चालले आहे. शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन हा अब्दुल सत्तार यांनी दिलेला सातबारा आहे.”
दरम्यान, आज शिवसेनेच्या (Shivsena) वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट दोघांनीही मेळाव्याचे आयोजन केले आहे. शिंदे गटाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा संध्याकाळी 07 वाजता किंग सर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs WI | चेतेश्वर पुजाराचा मोठा निर्णय! लवकरच सोडणार टीम इंडिया
- Shivsena | मातोश्रीच्या बाहेर शिंदे आणि ठाकरे गटाची जोरदार बॅनरबाजी
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर रिक्षा चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, नक्की काय आहे कारण?
- Eknath Shinde | ‘आदिपुरुष’मध्ये CM शिंदेंची एन्ट्री? नक्की काय आहे प्रकरण
- Hindu Dharma Sena | हिंदू धर्म सेनेची खास ऑफर! मुस्लिम मुलीशी लग्न करा अन् 11 हजार रुपये बक्षीस मिळवा