Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तूफान में कश्तियां और घमंड में हस्तियां डूब जाती है, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
Pride of wisdom sinks a man – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना कोणीतरी शायरी आणि डायलॉग लिहून देतं आणि ते तेच बोलतात. त्यांची नौका सध्या खूप डगमगत आहे, हे त्यांना लवकरच कळेल. ते शहाणे आणि आम्ही सगळे मूर्ख आहोत काय? अतिशहाणपणाचा अहंकार माणसाला बुडवतो.
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस शेरेबाजी खूप करतात. त्यामुळे मी त्यांना आता एक शेर सुनावणार आहे. तूफान में कश्तियां और घमंड में हस्तियां डूब जाती है. तुमचा अहंकार तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही.”
दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनीषा कायंदे यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “ही अशी लोक असतात ना, ती कचराप्रमाणे असतात. हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका बदलला की हा कचरा पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो. त्यामुळे त्या कचऱ्याकडे दुर्लक्ष करा. ती फार महान लोकं नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | मी अशा लोकांना कचरा म्हणतो – संजय राऊत
- Nitesh Rane | स्वतःचा पक्ष नसलेले वर्धापन दिन साजरा करत आहे – नितेश राणे
- IND vs WI | चेतेश्वर पुजाराचा मोठा निर्णय! लवकरच सोडणार टीम इंडिया
- Shivsena | मातोश्रीच्या बाहेर शिंदे आणि ठाकरे गटाची जोरदार बॅनरबाजी
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर रिक्षा चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, नक्की काय आहे कारण?