Sanjay Raut | मुंबई: काल मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षांतर करत असताना त्यांनी उद्धव ठाकरे गटावर खोचक टीका केली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ignore that garbage – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनीषा कायंदे यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “ही अशी लोक असतात ना, ती कचऱ्याप्रमाणे असतात. हा कचरा इकडे-तिकडे उडत असतो. हवेचा झोका बदलला की हा कचरा पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो. त्यामुळे त्या कचऱ्याकडे दुर्लक्ष करा. ती फार महान लोकं नाही.
शिंदे गटात प्रवेश करत असताना मनीषा कायंदे म्हणाल्या, “शिवसेना पक्षात (Sanjay Raut) मी गेल्या अनेक वर्षापासून आहे. यादरम्यान माझ्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. मला खूप विकास कामं करायची होती. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला कधीच संधी दिली नाही.”
दरम्यान, आज शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गट (Sanjay Raut) आणि शिंदे गट दोन्हीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- IND vs WI | चेतेश्वर पुजाराचा मोठा निर्णय! लवकरच सोडणार टीम इंडिया
- Shivsena | मातोश्रीच्या बाहेर शिंदे आणि ठाकरे गटाची जोरदार बॅनरबाजी
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर रिक्षा चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, नक्की काय आहे कारण?
- Eknath Shinde | ‘आदिपुरुष’मध्ये CM शिंदेंची एन्ट्री? नक्की काय आहे प्रकरण
- Hindu Dharma Sena | हिंदू धर्म सेनेची खास ऑफर! मुस्लिम मुलीशी लग्न करा अन् 11 हजार रुपये बक्षीस मिळवा