Nitesh Rane | सिंधुदुर्ग: आज शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटांनी वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्याचबरोबर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.
नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं आज पहिल्यांदा मोकळा श्वास घेत आहे. काल ओसाड गावाचे पाटील उद्धव ठाकरे यांनी शिबिर घेतलं आहे. निवडणूक आयोगानं यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असं नाव आणि मशाल चिन्ह दिलं आहे. त्यांच्याकडे शिवसेनेचं चिन्ह नाही शिवसेनेचं नाव नाही आणि ही लोकं शिवसेना वर्धापन दिन साजरा करत आहे.
Mahavikas Aghadi does not give respect to Sanjay Raut – Nitesh Rane
पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांना महाविकास आघाडीमध्ये कोणी मोजत नाही. संजय राजाराम राऊत यांना कुणी भाव देत नाही. संजय राजाराम राऊत यांची किंमत किती आहे? हे महाविकास आघाडीकडून वारंवार सांगितलं जात.”
दरम्यान, आज शिवसेनेच्या (Shivsena) वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट दोघांनीही मेळाव्याचे आयोजन केले आहे. शिंदे गटाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा संध्याकाळी 07 वाजता किंग सर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs WI | चेतेश्वर पुजाराचा मोठा निर्णय! लवकरच सोडणार टीम इंडिया
- Shivsena | मातोश्रीच्या बाहेर शिंदे आणि ठाकरे गटाची जोरदार बॅनरबाजी
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर रिक्षा चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, नक्की काय आहे कारण?
- Eknath Shinde | ‘आदिपुरुष’मध्ये CM शिंदेंची एन्ट्री? नक्की काय आहे प्रकरण
- Hindu Dharma Sena | हिंदू धर्म सेनेची खास ऑफर! मुस्लिम मुलीशी लग्न करा अन् 11 हजार रुपये बक्षीस मिळवा