Koyta Gang | पुणेकरांनो सावधान! पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत

Koyta Gang | पुणे: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गॅंग सक्रिय झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या गॅंगमधील अनेकांना अटक केली होती. तर काहींना हद्दपार केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा पुण्यात कोयता त्यांची दहशत वाढल्याचं दिसून आलं आहे.

The terror of the Koyta gang has been seen in the Warje area

पुण्यातील वारजे परिसरात कोयता गँगची (Koyta Gang) दहशत दिसून आली आहे. वारजे परिसरातील कॅनल रोडवर या गॅंगने काही गाड्यांच्या काचा फोडल्या आहे. वारजे येथील रामनगर कॅनल रोडवर नागेश्वर मंदिराजवळ सोमवारी (19 जुन) सकाळी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

ही घटना घडताचं  गाड्यांच्या मालकांनी पोलीस याबाबत माहिती दिली. पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. कोयता गँगने (Koyta Gang) तब्बल सात गाड्या फोडल्या आहेत. यामध्ये ऑटो रिक्षा, महिंद्रा झायलो कार, इको कार, दुचाकी, आणि सफारीचा समावेश आहे.

दरम्यान, रामनगर परिसरात गोळीबार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या परिसरात हा (Koyta Gang) प्रकार घडला आहे. त्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

महत्वाच्या बातम्या