Share

Sharad Pawar आणि AJit Pawar एकत्र आल्यास हरकत नाही, त्यांचा निर्णय मान्य असेल : सुप्रिया सुळे

With talks of Sharad Pawar and Ajit Pawar reuniting, Supriya Sule responds with a calm yet significant statement: “If they come together, I have no objection. We are united as a family.”

Published On: 

Supriya Sule Opens Up on Sharad Pawar–Ajit Pawar Reunion Possibility

🕒 1 min read

राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेनंतर, शरद पवार ( Sharad Pawar ) आणि अजित पवार यांच्यातील मतभेद संपून ते पुन्हा एकत्र येणार का, याची चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर त्यामध्ये मला कोणतीही हरकत नाही. आम्ही एक कुटुंब आहोत आणि आमच्यातील नातं खूप जुने आहे. राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक नात्यांमध्ये कुठेही कटुता नाही.”

Supriya Sule Opens Up on Sharad Pawar–Ajit Pawar Reunion Possibility

तसेच, सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते एनडी पाटील यांचा दाखला देत सांगितले की, “एनडी पाटील आणि पवार साहेबांमध्ये टोकाचे राजकीय मतभेद होते, पण आमचं कौटुंबिक नातं मात्र कायम घट्ट होतं. आमच्या आत्यांमध्ये कधीही कटुता आली नाही. अजित दादा जर आता सॉफ्ट होत असतील, तर त्यात काही गैर नाही.”

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, “शरद पवारांनी या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेकदा टीका केली आहे. पण हे दोन्ही नेते एकमेकांना आदरपूर्ण भेटतात”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांच्या या प्रतिक्रियेमुळे राज्याच्या राजकीय घडामोडींमध्ये नव्याने हालचाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही