Ajit Pawar | ठाकरेंना दणका! विधान परिषद विरोधीपक्षनेते पदावर NCP चा डोळा?

Ajit Pawar | बारामती: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. यामध्ये विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. विरोधकांमध्ये ज्यांचे सर्वाधिक आमदार त्यांचा विरोधी पक्षनेता असेल, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “सध्याच्या राजकीय … Read more

Published On: 

Ajit Pawar | बारामती: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. यामध्ये विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. विरोधकांमध्ये ज्यांचे सर्वाधिक आमदार त्यांचा विरोधी पक्षनेता असेल, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे.

माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “सध्याच्या राजकीय स्थितीचा नक्की विचार करण्यात येईल. हरिभाऊ बागडे साहेब जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, ज्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य असणार त्या पक्षाच्या नेत्याची मी विरोधी पक्षनेता पदावर निवड करेल.”

Everyone has the right to grow their party – Ajit Pawar

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले,”तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. मात्र, त्याच्यातून काही आमदार बाजूला गेले. ते कसे बाजूला गेले हे तुम्हाला माहीतच आहे. सर्वांना आपला पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे.”

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचा विधान परिषद विरोधीपक्षनेते पदावर डोळा आहे का? असा सवाल देखील उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही