Ravindra Jadeja | टीम महाराष्ट्र देशा: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना हरल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघ वेस्ट इंडीज विरुद्ध 02 कसोटी, 03 एकदिवसीय आणि 05 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
Ravindra Jadeja is likely to be dropped from the T20 squad
भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यामध्ये होणाऱ्या टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ला संघातून वगळल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेल (Akshar Patel) ला संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) गेल्या अनेक दिवसांपासून टी-20 क्रिकेटपासून दूर आहे. रवींद्र जडेजाने आशिया कप 2022 मध्ये शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला टी-20 विश्वचषक स्पर्धाही खेळता आली नव्हती. या स्पर्धेमध्ये त्याच्या जागी अक्षर पटेलला टीम इंडियात स्थान देण्यात आले होते.
दरम्यान, वेस्टइंडीज विरूद्ध (IND vs WI) भारतीय संघ पहिला कसोटी सामना 22 जुलै ते 16 जुलै दरम्यान तर दुसरा कसोटी सामना 20 जुलै ते 24 जुलै दरम्यान खेळणार आहे. एक दिवसीय मालिकेतील 03 सामने अनुक्रमे 27 जुलै, 29 जुलै आणि 15 ऑगस्ट रोजी खेळले जाणार आहे. तर टी-20 मालिकेतील 05 सामने अनुक्रमे 4 ऑगस्ट, 6 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट रोजी होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Crime News | आजार बरा करण्याचं कारण अन् भोंदूबाबाकडून महिलेचा शारीरिक छळ
- Ambadas Danve | ‘गद्दार दिन’ साजरा करण्यात यावा, यासाठी अंबादास दानवेंचं राज्यपालांना पत्र
- Viral News | दीड हजाराचा समोसा खा आणि 71 हजार रुपये जिंका, नक्की प्रकरण काय?
- Ajit Pawar | ठाकरेंना दणका! विधान परिषद विरोधीपक्षनेते पदावर NCP चा डोळा?
- Sanjay Raut | 20 जून जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा – संजय राऊत