Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: काल (19 जुन) शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटाकडून शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात होती. अशात भाजप नेते नितेश राणे यांनी देखील एक मागणी केली आहे. 27 जुलै देशद्रोही दिवस म्हणून घोषित करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत मागणी केली आहे. कृपया 27 जुलै हा देशद्रोही दिवस म्हणून घोषित करा, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा वाढदिवस असतो. याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी ही मागणी केली आहे.
The biggest traitor was born on July 27
निलेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. “कृपया 27 जुलै हा देशद्रोही दिवस म्हणून जाहीर करावा. या दिवशी सर्वात मोठा गद्दार जन्माला आला होता. या गद्दाराने महाराष्ट्राच्या इतिहासातील एका महान व्यक्ती असलेल्या आपल्या वडिलांच्या पाठीत वार केला होता”, असं नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
PUBLIC DEMAND!@UN@antonioguterres@UNinIndia @PMOIndia @UNICEFIndia @ShivSenaUBT_ @OfficeofUT @AUThackeray @unfoundation @UNHumanRights@rautsanjay61
Pls declare 27 July as “TRAITOR DAY” . One of the biggest traitor ever seen or experienced was born on this day . He…
— nitesh rane (@NiteshNRane) June 20, 2023
“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याच्या इच्छेपायी त्यानं भाजपसारख्या मित्राच्या पाठीत वार केला. त्याचबरोबर त्यानं स्वतःच्या धर्मालाही सोडलं नाही. भ्रष्टाचार करून पैसे कमावले आणि आपल्याच माणसाच्या पाठीत खंजर खुपसलं. म्हणून 27 जुलै हा देशद्रोही दिवस म्हणून घोषित करण्यात यावा”, असही त्यांनी (Nitesh Rane) या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Crime News | आजार बरा करण्याचं कारण अन् भोंदूबाबाकडून महिलेचा शारीरिक छळ
- Ambadas Danve | ‘गद्दार दिन’ साजरा करण्यात यावा, यासाठी अंबादास दानवेंचं राज्यपालांना पत्र
- Viral News | दीड हजाराचा समोसा खा आणि 71 हजार रुपये जिंका, नक्की प्रकरण काय?
- Ajit Pawar | ठाकरेंना दणका! विधान परिषद विरोधीपक्षनेते पदावर NCP चा डोळा?
- Sanjay Raut | 20 जून जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा – संजय राऊत