Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: काल शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गटाकडून शिवसेना वर्धापन दिन साजरा करण्यात आला. काल शिवसेना वर्धापन दिन होता, तर आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युनोला पत्र लिहिलं आहे. २० जून जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा असं, त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
June 20 should be declared World Traitor Day – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी 20 जून जागतिक गद्दार दिन घोषित करावा अशी मागणी केली आहे. जागतिक गद्दार दिन घोषित केल्यानंतर जगभरातील सर्व गद्दारांना एक व्याजपीठ मिळेल, असं देखील त्यांनी यामध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्रात 20 जून 2022 रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडली होती. त्याच दिवशी एकनाथ शिंदेंसह काही आमदार सुरतच्या दिशेने रवाना झाले होते. तिथून ते आमदार गुवाहाटीला रवाना झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार पडलं असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पत्रात म्हटलं आहे.
PUBLIC DEMAND!@UN@antonioguterres@UNinIndia @PMOIndia @UNICEFIndia @BJP4India @AUThackeray @unfoundation @UNHumanRights pic.twitter.com/OJ5qu28oY2
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 20, 2023
जगभरात गद्दार दिन साजरा करण्यात यावा, अशी मागणी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्राद्वारे केली आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना तुम्ही त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचं अविरत काम चालू ठेवलं होतं, असंही त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Crime News | आजार बरा करण्याचं कारण अन् भोंदूबाबाकडून महिलेचा शारीरिक छळ
- Ambadas Danve | ‘गद्दार दिन’ साजरा करण्यात यावा, यासाठी अंबादास दानवेंचं राज्यपालांना पत्र
- Viral News | दीड हजाराचा समोसा खा आणि 71 हजार रुपये जिंका, नक्की प्रकरण काय?
- Ajit Pawar | ठाकरेंना दणका! विधान परिषद विरोधीपक्षनेते पदावर NCP चा डोळा?
- Sanjay Raut | 20 जून जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा – संजय राऊत