🕒 1 min read
प्रतिनिधी: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आरटीओने ठरवलेल्या वेगमर्यादा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) चालकांकडून लाखो रुपयांचे दंड वसूल करण्यात आले आहे. या कारवायीत आतापर्यंत सहा कोटींच्या दंडापेक्षा जास्त रक्कम वसूल झाल्याचे सांगितले जात आहे. फक्त ठाणे विभागाकडूनच तब्बल ८० लाख रुपयांचे दंड वसूल झाले आहेत. या दंडाची रक्कम वाहन चालविणाऱ्या चालकांच्या पगारातून वसूल करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे मागणी करत म्हटले की, एसटी बस या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांवर वेगमर्यादेच्या नियमांमध्ये काही शिथिलता असावी. विशेषतः प्रवाशांच्या गरजेनुसार वेग थोडा वाढविणे आवश्यक आहे कारण काही वेळा रुग्णवाहतूक, महिला प्रवाशांची काळजी, तसेच प्रवाशांच्या वेळेच्या गरजांमुळे वेगमर्यादा पाळणे कठीण जाते.
ST Bus Drivers Fined Millions for Overspeeding
एसटी बस सेवा हे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या उद्देशाने चालविली जाते. त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये रस्त्यावरील वाहतुकीच्या अडचणी पाहून व प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून वेग थोडा वाढविणे योग्य ठरेल, असा दावा त्यांनी केला आहे.
घाट सेक्शनमधील चढ उतार असणाऱ्या मार्गावरही एसटीच्या वाहनांवर ताशी ४० किलोमीटरची वेगमर्यादा आहे, पण तिथेही वाहतूक परिस्थिती पाहून वेग वाढवावा लागतो. अशा वेळेस दंड वसूल करू नये, तसेच आतापर्यंत वसूल झालेल्या दंडाची रक्कम एसटीला परत देण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. सरकारी वाहन म्हणून एसटी बसना वेगमर्यादेत विशिष्ट परिस्थितींमध्ये शिथिलता देण्याची मागणी आता आरटीओसह शासनाकडे मांडण्यात येणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘अल्लाहने पाकिस्तानची शेपटी सरळ करावी, नाहीतर…’ ओवेसीची पाकला धमकी
- गुंडाराजाविरोधात बीडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवा! अंजली दमानियांची मागणी
- मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर