Share

छगन भुजबळ यांच्याकडून खंडणीची मागणी करणाऱ्या बनावट ‘आयकर अधिकाऱ्याला’ रंगेहाथ अटक

A 27-year-old fake income tax officer was caught red-handed demanding ₹1 crore from Chhagan Bhujbal’s PA. Police trapped and arrested him from a hotel in Nashik.

Published On: 

Chhagan Bhujbal reaction on Pune Rape Case

🕒 1 min read

नाशिक: माजी मंत्री आणि सध्याचे आमदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्याकडून १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ ने सापळा रचून करंजाळी येथील एका हॉटेलमध्ये अटक केली आहे. आरोपी राहुल दिलीप भुसारे हा स्वत:ला आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत होता.

गायकवाड यांना सतत अज्ञात नंबरवरून फोन येत होते. आरोपीने त्र्यंबकेश्वरमधील फार्महाऊसवर छापा टाकण्याची धमकी देत, त्यापासून वाचण्यासाठी १ कोटी रुपयांची मागणी केली होती. स्वीय सहाय्यकाने तात्काळ पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना याची माहिती दिली. त्यानंतर उप-आयुक्त प्रशांत बच्छाव यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी सापळा रचला.

Fake Income Tax Officer Demands ₹1 Crore Extortion from Chhagan Bhujbal

धरमपूर येथे आरोपीने बोलावले होते. मात्र तो तिथे न आल्याने पथक परतताना त्याने पुन्हा संपर्क करून करंजाळीमधील ‘हॉटेल रितम व्हॅली’ येथे बोलावले. याठिकाणी पोलिसांनी पंचासाक्षीदारांसह बनावट आणि काही खऱ्या नोटा वापरून सापळा रचला आणि त्याला रंगेहाथ अटक केली.

आरोपीकडून होंडा शाईन दुचाकी, मोबाईल, ₹५०० च्या ६० खऱ्या नोटा आणि १५ बंडल खेळण्यांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Nashik Crime India Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या