Anil Deshmukh । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अडचणीत येत आहेत. मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही त्यांच्या अडचणी कमी होत नाहीत. अशातच आता पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहेत.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. “बीडच्या एसपींची बदली करण्यासाठी धनंजय मुंडे माझ्या इतके मागे लागले होते की शेवटी त्यांनी माझी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती,” असा दावा देशमुखांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही कुणाच्या पसंतीचे अधिकारी दिले नव्हते. आमच्या सरकारने गुंडांना संरक्षण देणारे वातावरण राज्यात तयार होऊ दिले नाही,” असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
आपल्या मर्जीतील अधिकारी धनंजय मुंडे हे बीडला आणतात, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas), सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्यासह अनेकांनी केला आहे. अशातच आता अनिल देशमुख यांनी देखील असाच आरोप केला आहे.
Anil Deshmukh on Dhananjay Munde
यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. अनिल देशमुख यांच्या आरोपामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. यावर आता धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :