Share

Pune Rape Case प्रकरणी आरोपीला कोर्टाचा मोठा दणका, ‘इतके’ दिवस खावी लागणार जेलची हवा

by MHD
Datta Gade remanded police custody till March 12 in Pune Rape Case

Pune Rape Case । पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे (Pune swargate rape case) संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

72 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आज पोलिसांनी दत्ता गाडे (Datta Gade) याला शिरूर येथील गुनाट गावातून ताब्यात घेतले आहे. अटक केल्यानंतर दत्ता गाडे याने आपण अत्याचार केला नसल्याचे सांगितले. यामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

आज त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले होते. कोर्टाने दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी (Police custody ) सुनावली आहे. यामुळे अत्याचार केला नाही असे म्हणणाऱ्या दत्ता गाडे याला कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे.

पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी दत्ता गाडे याचा गुन्हेगारी इतिहास आहे. त्याच्यावर याआधीदेखील चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशातच आता त्याने पीडितेवर दोन वेळा अत्याचार केले आहेत.

Police custody to Datta Gade

दरम्यान, सध्या पोलीस आरोपीच्या गुन्हेगारी इतिहासाची सखोल चौकशी करत आहेत. तो इतर कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहे का? याबाबतचा खुलासा लवकरच होईल. आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता याचाही उलगडा पोलीस तपासादरम्यान होईल.

महत्त्वाच्या बातम्या :

The court has given a big blow to the accused Datta Gade in the Pune Rape Case.

Crime Maharashtra Marathi News Pune

Join WhatsApp

Join Now
by MHD