Share

Yogesh Kadam यांनी लाज-लज्जा विकली का? विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल

by MHD
Vijay Wadettiwar criticizes Yogesh Kadam statement on Pune Rape Case

Yogesh Kadam । पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकामध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेची संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट या प्रकरणावर भाष्य करताना असंवेदनशील वक्तव्य केले होते.

कदम यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी योगेश कदम (Vijay Wadettiwar Vs Yogesh Kadam) यांच्यावर निशाणा साधला आहे. “योगेश कदम यांनी लाज-लज्जा विकली का? की गुंडाळून ठेवलीय कमरेला? अशी विधान करताना मंत्र्यांनी थोडी लाज शरम बाळगावी,” असा सल्ला वडेट्टीवार यांनी योगेश कदम यांना दिला आहे.

“आरोपीला शोधण्याऐवजी पीडित मुलीला दोष देऊन काय सिद्ध करायचं आहे? आरोपीला क्लिनचीट देण्यासाठी मंत्र्यांची इतकी घाई का आहे? या प्रकरणातील आरोपीसोबत महायुतीचे नाते काय? आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलीवरच महायुतीतील मंत्र्याकडून आरोप का केले जात आहेत?”, असा सवाल विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, योगेश कदम यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण दिले आहे. “विरोधकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. माझ्या वक्तव्याला वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले,” असा दावा योगेश कदम यांनी केला आहे.

Yogesh Kadam Clarifies His Statement about pune rape case

“या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याला कोणत्याही परिस्थितीत वाचवले जाणार नाही. पुणे पोलिसांकडून या प्रकरणी कठोर कारवाई करत दोन दिवसांत आरोपीला अटक करण्यात आली आहे. हे आमच्या सरकारच्या कार्यक्षमतेचेच उदाहरण आहे,” असेही कदम म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

Yogesh Kadam statement has sparked a new controversy. Vijay Wadettiwar has criticized him.

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now