Share

योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करा; Prakash Ambedkar यांची फडणवीसांकडे मागणी

Remove Yogesh Kadam from the cabinet- Prakash Ambedkar

Prakash Ambedkar । पुण्यात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील (Pune rape case) फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पोलिसांच्या पथकाने रात्री शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून ताब्यात घेतले. चार दिवसांच्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी त्याला पकडण्यात यश मिळवले.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले की, “तरुणीने प्रतिकार किंवा आरडाओरड केली नसल्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला.” या वक्तव्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. योगेश कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील घटनेवर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांच्या असंवेदनशील वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी कदम यांच्यावर तीव्र टीका करताना त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली.

Remove Yogesh Kadam from the cabinet- Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पुण्याच्या अतिप्रसंगाच्या संदर्भात योगेश कदम ( Yogesh Kadam ) यांनी जे संवेदनशील वक्तव्य केलं ते दुर्दैवी आहे. कुठल्याही घटनेवर सामान्य माणूस शोक व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मंत्रिपदावर बसलेले मंत्री असे वक्तव्य करतात त्यातून पोलीस खात्याला मिळतो आणि आरोपीलाही बळ मिळते. असंवेदनशील मंत्री योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावे? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

प्रकाश आंबेडकरांनी पोलिसांवर ताशेरे ओढले

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, पोलिसांना एक आरोपी पकडण्यासाठी श्वान पथकाची गरज लागते. शंभर पोलिसांची गरज लागते. अनेक अधिकारी त्यांना लागले अशी परिस्थिती आहे. यावरून एकच स्पष्ट होत आहे की, पोलीस खाते कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच्या ऐवजी अजून काय काय करते? याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हणत त्यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले.

तसेच, “सरपंच देशमुख हत्याप्रकरणी दीड हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले. नीरव मोदीच्या संदर्भात असेच आरोपपत्र इंग्लंडच्या कोर्टात दाखल केलं तेव्हा त्यांनी भारतीय पोलिसांना झापले होते. तुम्ही PhD करत आहात की, चौकशी करत आहात ? तेव्हा हे PhD चे डॉक्युमेंट आहे का?” असा सवाल ॲड. आंबेडकरांनी या वेळी उपस्थित केला.

या घटनेमुळे समाजात तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा, यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar said Yogesh Kadam should be removed from the cabinet. Why should insensitive minister Yogesh Kadam be kept in the cabinet? Devendra Fadnavis should ask himself this question.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now