Devendra Fadnavis । गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणी (Pune Rape Case) माध्यमांशी संवाद साधत असताना एक वक्तव्य केले होते. यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे.
“आपण बोलत असताना काही चूक झाली तर त्याचा समाजमनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होत असतो. त्यामुळे मंत्री किंवा लोक प्रतिनिधींनी अशा प्रकरणात संवेदनशीलतेने बोलले पाहिजे,” असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
पुढे ते म्हणाले की, “योगेश कदम जे बोलले, त्यांचे वक्तव्य वेगळ्या पद्धतीने घेतले गेले. बस गर्दीच्या ठिकाणी होती पण लोकांना हा प्रकार होताना किंवा पीडितेने प्रतिकार करताना लक्षात आले नाही. असे सांगण्याचा कदम यांचा उद्देश होता,” असे फडणवीस म्हणाले.
“पोलिसांनी आरोपीला टेक्नॉलॉजीच्या आधारे शोधले. या घटनेचा लवकरच पर्दाफाश होईल. यासंदर्भात काही माहिती तपास सुरु असल्याने देणे बरोबर नाही. याचा देखील योग्य वेळी खुलासा केला जाईल,” अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली.
Amitesh Kumar announces reward of Rs 1 lakh in Pune Rape Case
दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला दिले जाईल? याची माहिती दिली आहे. “ज्या व्यक्तीने ट्रिगर माहिती दिली, म्हणजे शेवटची माहिती दिली त्या व्यक्तीला १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे,” असा खुलासा अमितेश कुमार यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :