Sanjay Raut । स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणी (Pune rape case) गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी माध्यमांशी बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर कडव्या शब्दांत टीका केली आहे.
“पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करून उपकार केले का? आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत. ते म्हणतात की बसमध्ये हाणामारी झाली, शांतपणे बलात्कार पडला. त्यामुळे बाहेर असणाऱ्या लोकांना समजले नाही. अशी गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे,” असे राऊत म्हणाले.
“तरुणीचा तिचा गळा आणि तोंड दाबून तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असून पुण्यामध्ये या गोष्टी का घडत आहेत? गुंडांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
“पोलिस असो की कायदा, आम्ही कसंही मॅनेज करू असा विश्वास गुंडांमध्ये तयार झाला आहे. राजकीय वरद हस्त लाभलेले हे गुन्हेगार मोकाट फिरतात. इतकेच नाही तर गुन्हेगार हे कोणाचे नसतात, ते कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात,” असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut slams Ajit Pawar and Yogesh Kadam
दरम्यान, पुणे अत्याचार प्रकरणी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) आणि योगेश कदम यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका