Yogesh Kadam । माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. “तुझ्या घरी आया-बहिणी नाहीत का?” असा संतप्त सवाल करत त्यांनी कदम यांना झापले.
“योगेश कदम म्हणतात अत्याचारावेळी संबंधित मुलगी ओरडली नाही. तुला लाज वाटते का? तुझ्या घरी आया-बहिणी नाहीत का? एखाद्या स्त्रीवर असे बोलणे, तिच्यावर बलात्कार झाला पण ती ओरडली नाही. योगेश कदम यांना म्हणायचंय तरी काय? असा संतप्त सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. (Jitendra Awhad on Yogesh Kadam)
“योगेश कदम राज्यमंत्रिमंडळाचे प्रतिनिधी आहे. तो बाहेर येऊन अशी वक्तव्य करतो,” अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी योगेश कदम यांचा समाचार घेतला आहे. यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होऊ शकतो.
जितेंद्र आव्हाड यांनी नंबर प्लेटवरूनही मोठा गौप्यस्फोट केला आहे. “महाराष्ट्रात नंबर प्लेटवरून मोठा घोटाळा (Number plate scam) होत आहे. नंबर प्लेट गोव्याला १०० रुपयाला मिळते. तीच नंबर प्लेट महाराष्ट्र राज्यात ५०० तर गुजरातमध्ये १५० रुपयांना मिळते,” असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Jitendra Awhad on Vehicle number plate
भारतातल्या सर्व राज्यात स्वस्त मिळणारी नंबर प्लेट महाराष्ट्रात तिप्पट किमतीने मिळत आहे. हीच नंबर प्लेट लोक रांगेत उभे राहून घेत आहेत. ही नंबर प्लेट लोकांनी घेऊ नये. नंबर प्लेट घेतली नाही तर राज्य सरकार काय करते? असे आव्हान देखील आव्हाड यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :