Share

Walmik Karad च्या पुन्हा अडचणी वाढल्या? देशमुख कुटुंबीय तुरुंग प्रशासनाकडे करणार ‘ही’ मोठी मागणी

by MHD
Santosh Deshmukh family alleges that Walmik Karad get VIP treatment in jail

Walmik Karad । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) ८४ दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे.

कालच न्यायालयात १५०० पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचा हात आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याला तुरुंगात मागील काही दिवसांपासून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

याप्रकरणी आता पुन्हा एकदा देशमुख कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. देशमुख कुटुंब तुरुंग प्रशासनाकडे याची तक्रार करणार असून या तक्रारीद्वारे कारागृहात असणाऱ्या सीसीटीव्हीचे फुटेज मिळण्यात यावे, अशी मागणी करणार आहे.

जर तुरुंग प्रशासनाने मागणीची दखल घेतली नाही तर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार करू असा इशाराही देशमुख कुटुंबीयांनी दिला आहे. त्यामुळे आता तुरुंग प्रशासन देशमुख कुटुंबीयांची मागणी मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

VIP Treatment To Walmik Karad

जर तुरुंग प्रशासनाने देशमुख कुटुंबीयांची मागणी मान्य केली नाही तर निदान देवेंद्र फडणवीस याची दखल घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्य सरकारकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

It is being suspected that Walmik Karad is involved in the Santosh Deshmukh murder case. This is how his problems have increased now.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now
by MHD