Pune Rape Case । पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील एका शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे दत्तात्रय गाडे (Dattatraya Gade) या आरोपीने 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केला (Pune Swargate Crime) आणि तो फरार झाला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची एक दोन नव्हे तर तब्बल 13 पथके तैनात होती.
अखेर या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मध्यरात्री ड्रोन आणि श्वान पथकाच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेतला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला रात्रीच लष्कर पोलीस ठाण्यात ठेवले होते. (Pune Crime)
त्यावेळी आरोपीची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने फलटणला जाणाऱ्या तरुणीवर अत्याचार करण्यापूर्वी दुसऱ्याच एका तरुणीला आपल्या जाळ्यात फसवलं होतं.
इतकेच नाही तर आरोपीने त्या तरुणीचा विश्वास मिळवला होता. पण संबंधित तरुणी वेळीच सावध झाली आणि आरोपीचा डाव फसला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केल्याची शक्यता आहे.
Pune Swargate Rape Case
हा आरोपी दिवसभर आपल्या गावात राहायचा आणि रात्री पासचा वापर करत स्वारगेट, अहिल्यानगर, शिवाजीनगर, शिरुर एसटी स्टँडवर फिरत असायचा. सध्या पोलिसाकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तपासादरम्यान आणखी माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :