Share

Santosh Deshmukh हत्याप्रकरणी चार्जशीट दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

by MHD
Suresh Dhas on Santosh Deshmukh Murder Case Charge Sheet

Santosh Deshmukh । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh Murder Case) 83 दिवस झाले आहेत. तरीही याप्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याला पोलिसांना अटक करण्यात यश आले नाही.

आज बीड न्यायालयात सीआयडीचे प्रमुख बसवराज तेली, तपासी अधिकारी अनिल गुजर, किरण पाटील यांनी तब्बल 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता या आरोप पत्रातुन संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे सत्य समोर येणार आहे.

संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळेच करण्यात आली असावी, असा आरोप केला जात आहे. या प्रकरणामध्ये सध्या अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याचा सहभाग आहे का? हे लवकरच स्पष्ट होईल.

या प्रकरणात सात आरोपींनी कशा प्रकारे कट रचला? संतोष देशमुख यांची हत्या कशी केली? हत्येची वेळ आणि ठिकाण कोणते? आरोपींचा गुन्हेगारी इतिहास काय आहे? यासंबंधी पुरावे या चौकशीतून समोर येणार आहे.

Suresh Dhas on Santosh Deshmukh Murder Charge Sheet

दरम्यान, सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र सादर करताच भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मकोका, हत्या, खंडणी, अॅट्रोसिटी अशा सर्व प्रकरणात आरोपपत्र दाखल झाली असून जर गुन्हेगारांवर 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल झाले नाही तर संबंधित आरोपी जामिनास पात्र ठरतो. पण संतोष देशमुख हत्याप्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारांसमोर जामिनाचा पर्याय ठेवला नाही,” अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

It is being alleged that Santosh Deshmukh was killed for obstructing the extortion case.

Marathi News Crime Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now