Pune Rape Case | स्वारगेट बस स्थानकावर २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (Dattatray Gade) याला अटक केली आहे. मात्र, अटक प्रक्रियेदरम्यान पोलिसांना अनपेक्षित गोंधळाला सामोरे जावे लागले.
गुणाट गावात शोधमोहीम राबवताना पोलिसांनी दत्ता प्रमाणेच दिसणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यालाच आरोपी समजले. परंतु काही वेळाने हा व्यक्ती दत्तात्रय नसून त्याचा भाऊ असल्याचे उघड झाले. त्याने स्पष्ट केले, “मी दत्ता नाही, माझा भाऊ माझ्यासारखा दिसतो. तुम्ही चुकीच्या व्यक्तीला अटक केली आहे.” त्यानंतर पोलिसांनी खात्री करून त्याला सोडले. अटके दरम्यान झालेल्या छोट्या चुकांमुळे गोंधळ निर्माण झाला असला तरी, शेवटी पोलिसांनी आरोपीला पकडण्यात यश मिळवले.
Police mistakenly arrested the wrong person In Pune Rape Case
शेवटी, नातेवाईकांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दत्ताला (Dattatray Gade) एका कॅनॉलजवळ झोपलेल्या अवस्थेत शोधून काढले आणि अटक केली. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली. रात्री २ वाजता त्याला पुण्यात आणण्यात आले आणि ३ वाजता तपासणी पूर्ण झाली. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका