Pune Rape Case । पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात (Swargate Shivshahi Bus Rape Case) अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या (Dattatray Gade) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी दोन दिवसांपासून उसात लपून बसला होता, पण त्याला जेवायला मिळत नसल्याने तो नातेवाईकांकडे गेला. (Pune Crime)
100 पोलीस, ड्रोन आणि श्वान पथकांच्या मदतीने दत्ता गाडेचा शोध घेण्यात आला. नातेवाईकांच्या घराच्या परीसरात असलेल्या बेबी कॅनॅालमध्ये झोपला होता. तिथेच पोलिसांनी त्याला अटक केली. महत्त्वाचे म्हणजे आरोपीला पकडण्यासाठी ग्रामस्थांनीही पोलिसांना मदत केली.
सध्या त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. अशातच आता दत्तात्रय गाडे याच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक होण्यापूर्वी दत्तात्रय गाडे आत्महत्या करणार होता. आत्महत्या करण्यासाठी गाडे याने हातात एक कीटकनाशकाची बॉटलही घेतली होती.
पण गावकऱ्यांनी त्याला शरण जाण्यास भाग पाडले. त्याला अटक केली त्यावेळी त्याच्या हातात रोगर औषधाची बॉटल होती, असा दावा गावकऱ्यांनी केला आहे. दत्तात्रय गाडे याची आज ससून रुग्णालयात पहाटेच वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आज त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी सुनावणीदरम्यान न्यायालय त्याला काय शिक्षा देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
Accused Dattatray Gade Attempted Suicide
हा आरोपी दिवसभर आपल्या गावात राहायचा आणि रात्री पासचा वापर करत स्वारगेट, अहिल्यानगर, शिवाजीनगर, शिरुर एसटी स्टँडवर फिरत असायचा. दरम्यान, तपासामध्ये समोर आलेल्या माहितीमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :