Share

Datta Gade चा धक्कादायक दावा; म्हणाला; “अत्याचार केलाच नाही, सहमतीने आमचे…”

by MHD
Shocking claim of accused Datta Gade in Pune Rape Case

Datta Gade । शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या दरम्यान शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून स्वारगेट बलात्कार प्रकरणातील (Pune Swarget Case) आरोपी दत्ता गाडेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. आज त्याला न्यायालयात सुनावणीसाठी हजर केले आहे.

सध्या त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान, दत्ता गाडे याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे सर्वांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध झाले, असा दावा दत्ता गाडे यांनी केला असल्याची माहिती समोर आली आहे.

दत्ता गाडे याच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, अटक केल्यानंतर दत्ता गाडे याने पोलीस कोठडीत टाहो फोडला आहे. माझं चुकलं, मी पापी आहे, असे म्हणत तो रडत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma) आणि पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (Smartana Patil) यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्याकडून दत्ता गाडे याची सखोल चौकशी केली जात आहे. दत्ता गाडे याची चौकशी सुरु असताना अनेक खळबळजनक माहिती समोर येत आहे.

Accused Datta Gade Attempted Suicide

अटक होण्यापूर्वी दत्ता गाडे आत्महत्या करणार होता. आत्महत्या करण्यासाठी गाडे याने हातात एक कीटकनाशकाची बॉटलही घेतली होती. पण त्यापुर्वी त्याला पोलिसांनी अटक केली, असा खुलासादेखील गुनाटमधील गावकऱ्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Datta Gade has made a shocking revelation During the police investigation in Pune Rape Case.

Crime Maharashtra Marathi News Pune

Join WhatsApp

Join Now