Pune Rape Case । पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार (Swargate Rape Case) केल्याची धक्कादायक घडली होती. या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. दत्ता गाडे (Datta Gade) असं या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.
गुनाट या गावातून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी पीडित मुलीबाबत मोठा खुलासा केला आहे. “मला संबंधित तरुणीचा आणि तिच्या मित्राचा फोन आला होता. आरोपीची बायको कोणाची भाषा करत आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला ती रडून सांगत आहे,” असे मोरे यांनी स्पष्ट केले.
“आरोपी सुखात कोठडीमध्ये जाऊन बसला असून पीडित तरुणीला मात्र बसवून ठेवले जात आहे. ७५०० दिले असते तर पीडित मुलीची बॅग पोलीस ठाण्यात होती. त्यावेळी त्या बॅगेची तपासणी का केली नाही. आज आम्ही मनाई आदेश घालावे, म्हणून न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. पीडितेला आत्महत्या करावीशी वाटत आहे,” असा खुलासा मोरे यांनी केला आहे.
Vasant More on Swargate Rape Case
वसंत मोरे यांच्या खुलास्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, स्वारगेट बसस्थानक अत्याचारप्रकरणी वसंत मोरे यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे, हे प्रकरण समोर येताच त्यांनी स्वारगेट डेपोची तोडफोड केली होती.
महत्त्वाच्या बातम्या :