Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विरोधकांनी त्यांना राजीनाम्याच्या मागणीवरून चांगलेच घेरले आहे. अशातच आज त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.
माहितीनुसार त्यांच्यात 10 ते 15 मिनिटे चर्चा झाली. पण चर्चेचा विषय अजूनही समजला नाही. या भेटीदरम्यान, धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द केला का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.
एकीकडे विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे तर दुसरीकडे मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली आहे. यामुळे आजच्या फडणवीस आणि मुंडे यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आजपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांच्यापाठोपाठ कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे सरकार या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Karuna Munde on Dhananjay Munde
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवसांपूर्वी लिहून घेतला असून अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी त्यांचा राजीनामा होईल, असा दावा रविवारी करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.
महत्त्वाच्या बातम्या :