Datta Gade । पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये (Swargate Rape Case) घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी दत्ता गाडे याला कोर्टाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुरु आहे. सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे.
चौकशीदरम्यान दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच आता त्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. अत्याचारची घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी रात्री आरोपीने दुसऱ्याच एका महिलेची छेड काढली होती. (Pune rape case)
पोलिस खात्यात भरती करून देतो म्हणून बस स्टॅंडवर त्याने तिचा नंबर घेतला होता. तो तिला सहा वेळा फोन करत तिला पहाटे लगेच ये म्हणत होता. नंतर त्याने शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता.
तसेच दत्ता गाडे याने चौकशीदरम्यान पीडित तरुणीने आपल्याकडून साडे सात हजार रुपये घेतले होते आणि त्यावेळी तिथं तरुणीचा एक एजंट उपस्थित होता अशी माहिती दिली होती. दत्ता गाडे याच्या वकिलांनी देखील दत्ता गाडे आणि पीडित तरुणी महिन्याभरापासून एकमेकांना ओळखत असल्याने त्यांच्या फोन कॉलची चौकशी करण्याची मागणी केली होती.
Swargate Rape Case Accused Datta Gade Phone Details
तपासादरम्यान पीडितेच्या मोबाईलचे सीडीआर डिटेल्स समोर आले आहेत. यावेळी त्या दोघांमध्ये कोणताही संपर्क झाला नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. दत्ता गाडेच्या बँक खात्यामध्ये अत्याचाराच्या घटनेआधी केवळ २४९ रुपये होते अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्याकडे पीडित तरुणीला द्यायला पैसे कुठून आले? असा सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या :