Share

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी Jitendra Awhad यांच्या हातात बेड्या, नेमकं कारण काय?

Why did Jitendra Awhad wear handcuffs on the first day of the convention? This is the question asked by the attendees. Jitendra Awad has answered this while talking to the media.

by MHD

Published On: 

Jitendra Awhad Protest in Vidhan Bhavan

Jitendra Awhad । आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session 2025) पहिला दिवस आहे. पण अधिवेशनाचा पहिलाच दिवस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कारण जितेंद्र आव्हाड हे हातात बेड्या घालून विधानभवनात दाखल झाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या का घातल्या? असा सवाल उपस्थितांना पडला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना याचे उत्तर दिले आहे. अमेरिकेमध्ये भारतीय लोकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात प्रतीक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, त्यामुळे हातात बेड्या घातल्या असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

“ट्रम्प सरकारने आखलेले धोरण अनेक भारतीय लोकांचे संसार उध्वस्त करणारे आहे. ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात कोंबून भारतात पाठवले, हे भारतीयांना हिणवणारा आणि भारतीयांना अपमानित करणार होता,” असे आव्हाड म्हणाले.

“अमेरिकमध्ये असणारे भारतीय लोक अन्याय सहन करत असून त्याविरोधात आपण आवाज उठवणे गरजेचे आहे. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. जर आपण या अन्यायाविरोधात आवाज उठवला नाही तर एक दिवस अमेरिका आपल्याला गिळून टाकेन,” असा दावा आव्हाड यांनी केला.

Jitendra Awhad on Dhananjay Munde

तसेच जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि सरकारवरदेखील निशाणा साधला. “मला वाटतं नाही की सरकार धनंजय मुंडेला बेड्या घालेल. संतोष देशमुखांच्या हत्येचा वाल्मिक कराड (Walmik Karad) मास्टर माइंड आहे. तो धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे. धनंजय मुंडे यांनी हे स्वत: सांगितले आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही