Chhaava । 14 फेब्रुवारी रोजी अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांची भूमिका असणारा छावा हा सिनेमा रिलीज झाला. रिलीज होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. (Chhaava Box Office Collection) फक्त भारतातच नाही तर जगभरातही या सिनेमाचा बोलबाला आहे.
कमाईच्या बाबतीत बोलायचे झाले तर छावा या सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली होती. 17 व्या दिवशी म्हणजे काल या सिनेमाने चांगलीच कमाई करत बाहुबली या सिनेमाच्या लाईफटाईम कलेक्शनला मात दिली आहे.
बाहुबली या सिनेमाने 421 कोटींची कमाई केली होती. तर भारतात 17 दिवसांमध्ये छावा या सिनेमाने जवळपास 459.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात केलेल्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर रविवारपर्यंत या सिनेमाने जगभरात 620 कोटींची कमाई केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे बॉक्स ऑफिसवरील इतर सिनेमांनाही हा सिनेमा चांगलीच टक्कर देत आहे. दिग्दर्शिका रीमा कागती दिग्दर्शित सुपरबॉयज ऑफ मालेगाव (Superboys of Malegaon) या सिनेमाने आतापर्यंत फक्त 1.82 कोटी रुपयांची कमाई करण्यात यश आले आहे.
Chhaava Box Office Collection in Day 17
तसेच क्रेझी (Crazy) या सिनेमाने आतापर्यंत फक्त 3.85 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमामध्ये सोहम शाह, निमिषा सजयन, टीनू आनंद, शिल्पा शुक्ला आणि उन्नति खुराना हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. एकंदरीतच छावा या सिनेमामुळे इतरसिनेमांना चांगलाच फटका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :