Santosh Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) जवळपास तीन महिने पूर्ण होत आली आहेत. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. काही दिवसांपूर्वी मकोका अंतर्गत कारवाई सुरु असणाऱ्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याच या हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते.
अशातच आता या हत्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. केज कोर्टाने आरोपी सिद्धार्थ सोनवणे (Siddharth Sonawane) याला 25 हजारांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर झाला आहे.
सिद्धार्थ सोनवणे याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याने सीआयडीकडून (CID) आरोपपत्रात त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता. आरोपपत्रातून नाव वगळल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे याला जामीन मंजूर केला आहे. या हत्याप्रकरणात पहिला जामीन मंजूर झाल्याने याचे पडसाद राज्यात उमटतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
दरम्यान, पोलिसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
Siddharth Sonawane bail order by court
पण आता केज कोर्टाकडून सिद्धार्थ सोनवणे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवाय संतोष देशमुख हत्याप्रकरणाला तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला तरी कृष्णा आंधळे हा पोलिसांना सापडला नाही. सातत्याने त्याच्या अटकेची मागणी देशमुख कुटुंबियांकडून केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :